
Post Office GDS Bharti 2024 : भारतीय डाक विभागामार्फत मेगा भरती जाहिर करण्यात आली आहे. एकुण 44228 जागा भरावयाच्या असून त्यामध्ये GDS ब्रँच पोस्ट मास्टस (BPM), GDS-असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) पदाच्या जागावर भरती करण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण व संगणक कोर्स उत्तीर्ण असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 15/07/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 05/08/2024 पुर्वी अर्ज करावा.
Vacancy Details
भारतीय डाक विभागात एकुण 44228 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्यासाठी महिला व पुरुष उमेदवार दोघेही अर्ज करु शकतात. खालील तक्त्यात पदानुसार पदसंख्या दर्शविण्यात आली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | GDS – ब्रँच पोस्ट मास्टर (BPM) | 44228 |
2 | GDS – असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) | |
एकूण | 44228 |
Post Office GDS Bharti 2024 Educational Qualification
वरील दोन्हीही GDS पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे मुलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असावे.
Age Limit
पोस्ट ऑफिस GDS पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे सूट देण्यात आली असून SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे. (अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.)
Exam Fee
पोस्ट ऑफिस GDS पदाचा अर्ज करण्यासाठी General/OBC/EWS प्रवर्गासाठी रु.100/- शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/PWD व महिला उमेदवारांना शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.
Post Office GDS Bharti 2024 Salary
जाहिरात दिलेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिस GDS पदावर निवड होणा-या उमेदवारांना खालीलप्रमाणे मानधन मिळेल.
पद क्र. | पदाचे नाव | मानधन/Salary Slab |
1 | GDS – ब्रँच पोस्ट मास्टर (BPM) | Rs.12,000-Rs.29,380/- |
2 | GDS – असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) | Rs.10,000-Rs.24,470/- |
Post Office GDS Bharti 2024 date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 15/07/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 05/08/2024 |
अर्जामध्ये दुरुस्ती दिनांक | 06/08/2024 ते 08/08/2024 |
Post Office GDS Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची इ.10 वी आणि 12 वी च्या गुणांनुसार सिस्टमआधारे जास्तीत जास्त गुण असणा-या उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यानुसार मेरीट लिस्टआधारे निवड होईल. कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
इंडियन बँकेत अप्रेंटिस पदाच्या एकुण 1500 जागा
Post Office GDS Bharti 2024 online form apply online Maharashtra
- पोसट ऑफिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईटवर भेट देऊन मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार क्रमांक वापरुन नोंदणी करावी. त्यानंतर इ.10 वी, 12वी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, फोटो व सही अपलोड करावी.
- त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |