
IBPS Clerk Bharti 2024 : Institute of Banking Personnel Selection म्हणजेच IBPS CRP Clerks-XIV तर्फे लिपिक पदाची मेगा भरती आयोजित करण्यात आली असून एकुण 6128 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर लिपिक भरतीकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले असून दिनांक 01/07/2024 पासून ते शेवट दिनांक 28/07/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याअगोदर कृपया मूळ जाहिरात वाचावी.
IBPS Clerk Bharti 2024 Vacancy
आयबीपीएस तर्फे विविध पदांच्या परीक्षा आयोजित केल्या जात असतात. त्याचप्रमाणे विविध बँकामधील कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी एकत्रित लिपिक पदाची भरती आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये एकुण 6128 जागा भरण्यात येणार आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | लिपिक | 6128 |
एकूण | 6128 |
IBPS Clerk Bharti 2024 Education Qualification
IBPS लिपिक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे तसेच संगणक साक्षरता – संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे किंवा हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
IBPS Clerk Bharti 2024 Age Limit
आयबीपीएस तर्फे तर्फे जाहिर झालेल्या लिपिक भरतीसाठी अर्ज करणा-या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी वय 20 ते 28 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
IBPS Clerk Bharti 2024 Fee
लिपिक पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार असून General व OBC प्रवर्गातील उमेदवारांना रु.850/- शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना रु.175/- परीक्षा शुल्क भरावे लागेल.
IBPS Clerk Bharti 2024 date
अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक | 01/07/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 28/07/2024 |
पुर्व परीक्षा | 12/08/2024 ते 17/08/2024 |
मुख्य परीक्षा | ऑक्टोबर 2024 |
IBPS Clerk Bharti 2024 Selection Process
IBPS लिपिक पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची पुर्व व मुख्य अशा परीक्षा घेण्यात येतील. त्यामध्ये गुणांच्या आधारे मेरीटवर आधारीत कागदपत्रांची पडताळणी करुन नंतर निवड करण्यात येईल.
How to apply IBPS Clerk Bharti 2024 online
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/ या वेबसाईटवरुन मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरुन नवीन रजिस्ट्रेशन करुन घ्यावे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी.
- फोटो, सही, डाव्या हाताराचा अंगठा, स्वहस्ताक्षरात लिहिलेले Declaration
- तसेच Webcamera किंवा मोबाईल फोनचा वापर करुन Live फोटो Capture करावा.
- त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरुन फॉर्म सबमीट करावा.
- अर्जाची एक प्रिंट करुन ठेवावी.
SSC MTS Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे MTS व हवालदार पदाच्या 8326 जागा
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |