
SSC JE Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत Junior Engineer पदासाठीच्या एकुण 968 जागा केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांवर भरण्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार अभियंत्यांना चांगली संधी चालून आली आहे. सदर भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे राबविण्यात येत असून ह्या भरतीकरीता पुरुष व महिला दोन्ही उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगणारे पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक 15/04/2024 असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
SSC JE Bharti एकुण पदांचा तपशिल :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 788 |
2 | ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) | 15 |
3 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical) | 128 |
4 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) | 37 |
Total | 968 |
SSC JE Bharti महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 28/03/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 18/04/2024 |
ऑनलाईन पेमेंट शेवट दिनांक | 19/04/2024 |
अंदाजित परीक्षा दिनांक | 04/06/2024 – 06/06/2024 |
SSC JE Bharti शैक्षणिक पात्रता :
Junior Engineer पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदानुसार सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रीकल अँड मेकॅनिकल मधील इंजिनियरींग पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
SSC JE Bharti वयोमर्यादा :
ज्युनियर इंजिनियर पदाचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01/08/2024 रोजी 30/32 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Also Read : बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना संधी 143 जागांवर ऑफिसर पदाची भरती
SSC JE Bharti परिक्षा शुल्क :
ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खुला व इतर मागासवर्ग उमेदवारांना रु.100/- शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC/ST/PwBD व महिला उमेदवारांना शुल्क लागू नाही.
SSC JE Bharti निवड प्रक्रिया :
ह्या भरतीकरीता ज्युनियर इंजिनियर पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांची दोन टप्प्यात कॉम्प्युटर द्वारे लेखी परीक्षा घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील परिक्षा पास होणार्या उमेदवारांनी दुसर्या टप्प्यात परीक्षा होईल व दोन्ही परीक्षांचे एकुण गुणांच्या आधारे मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).
SSC JE Bharti अर्ज कसा करावा?
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in ह्या वेबसाईटवर भेट देऊन One Time Registration (OTR) रजिस्ट्रेशन करुन त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरुन फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावी. परिक्षा शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |