
SSC MTS Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे दरवर्षी होणाऱ्या Staff Selection Commission Multi-Tasking (Non-Technical) Staff व हवालदार पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) व हवालदार (CBIC & CBN) ही पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवट दिनांक 31 जुलै 2024 पुर्वी अर्ज करावा.
SSC MTS Bharti 2024 Vacancy
दरवर्षीप्रमाणे देशभरात आयोजित केली जात असलेली ही मेगा भरती याही वर्षी आयोजित करण्यात आली आहे. या मेगा भरतीमध्ये विविध पदावर भरती करण्यात येणार आहे. पदनिहाय तपशिल खालीलप्रमाणे.
पद क्र. | पदाचे नाव |
1. | मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – 4887 |
2. | हवालदार (CBIC & CBN) – 3439 |
एकुण – 8326 |
SSC MTS Bharti 2024 Eligibility
सदर पदभरतीसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Age Limit:
1 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे वय
- MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
मागासवर्गीयांना सरकारी नियमाप्रमाणे सूट असुन OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असुन SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे 17727 पदांची बंपर भरती, पदवीधरांना संधी
SSC MTS Bharti 2024 Fee
ह्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये General/OBC रु.100/- रुपये शुल्क असून SC/ST/ExM/ महिला उमेदवारांना अर्ज शुल्क लागू नसून सुट देण्यात आली आहे.
SSC MTS Bharti 2024 date
अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक | 27/06/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 31/07/2024 |
ऑनलाईन पेमेंट शेवट दिनांक | 01/08/2024 |
अर्जात दुरुस्ती दिनांक | 16/08/2024 ते 17/08/2024 |
परीक्षा | ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 |
SSC MTS Bharti 2024 Selection process
अर्ज करणा-या उमेदवारांची कॉम्प्युटवर दोन सेशनमध्ये लेखी (Objective Type) परिक्षा होणार आहे. जे उमेदवार ह्या परिक्षेमध्ये पास होतील अशा उमेदवारांची फिजिकल टेस्ट व त्यानंतर कागदपत्र पडताळणीनंतर मेरीटवर आधारित निवड करण्यात येणार आहे.
How to apply SSC MTS 2024 online
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in साईटवर जा.
- साईटवर गेल्यावर SSC MTS लिहिलेले असेल त्या समोरील Apply बटनावर क्लिक करा.
- त्यात One Time Registration करुन फोटो व सही अपलोटा करा. ऑनलाईन फॉर्म विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
- शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरावे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |