Bombay High Court Driver Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्या आस्थापनेवर वाहनचालक पदाची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Bombay High Court Driver Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर यांच्या आस्थापनेवर वाहनचालक या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 5 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे अशा एकुण 8 पदांवर भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी पात्रताधारक निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 19/06/2024 पासून ते शेवट दिनांक 03/07/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Bombay High Court Driver Bharti 2024

Bombay High Court Driver Bharti 2024 Eligibility

  1. वाहनचालक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  3. उमेदवाराकडे मोटार वाहन अधिनियम 1988 (क्र.59/1988) प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा.
  4. तीन वर्षे हलके किंवा जड वाहन मोटार वाहन चालविण्याचा अनुभव.
  5. उमेदवारास वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Age Limit

मुंबई उच्च् न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे निघालेल्या वाहनचालक भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे असावे तर मागासवर्गीय उमेदवाराचे वय 21 ते 43 वर्षे असावे.

Central Bank of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी पदावर भरती, एकुण 484 जागा

Bombay High Court Driver Bharti 2024 Fee

वाहनचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. 200/- शुल्क भरावे लागणार आहे.

Bombay High Court Driver Bharti 2024 Salary

सदर पदाची वेतन मॅट्रीक्स एस -10 : रु.29,200 – 92,300/- अधिक नियमानुसार देय भत्ते अशी आहे.

Bombay High Court Driver Bharti 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक19/06/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक03/07/2024

Bombay High Court Driver Bharti 2024 Selection Process

या भरतीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार अल्पसुची तयार करून त्यानंतर परीक्षा घेऊन निवड करण्यात येईल.(कृपया मूळ जाहिरात वाचणे)

Bombay High Court Driver Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज दाखल करावा. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी. ऑनलाईन पेमेंट करून अर्जाची प्रिंट करून ठेवावी .

Leave a Comment