Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलात एकुण 320 पदांची भरती, 10 वी पास असणार्‍यांना संधी

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदाच्या 320 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इ.12वी व इ.12 वी पास उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करावयाचा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 10/07/2024 असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.

Indian Coast Guard Bharti 2024 Vacancy

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1नाविक (GD) 01/2025 बॅच260
2यांत्रिक (GD) 01/2025 बॅच60
Total320

Indian Coast Guard Bharti 2024 Last Date

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात13/06/2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक10/07/2024
अंदाजित परीक्षा दिनांकसप्टेंबर/नोव्हेंबर 2024 & एप्रिल 2025

Indian Coast Guard Bharti 2024 Eligibility

नाविक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार इ.12 वी सायन्स (Maths / Physics) विषयासह उत्तीर्ण असावा.यांत्रिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) असणे आवश्यक आहे.

Indian Coast Guard Bharti 2024 Age

भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदावर अर्ज करणार्‍या उमेदवाराचा जन्म दिनांक 01/03/2003 ते 28/02/2007 च्या दरम्यान झालेला असावा. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट असून OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट आहे.

Indian Coast Guard Bharti 2024 Exam Fee

ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खुला व इतर मागासवर्ग उमेदवारांना रु.300/- शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC/ST उमेदवारांना शुल्क लागू नाही.

Read Also : Air India Services Limited मध्ये Aircraft Technician पदाच्या 100 जागा

Indian Coast Guard Bharti 2024 Selection Process

ह्या भरतीकरीता नाविक व यांत्रिक पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना चार टप्पे पार करावे लागणार आहे. त्यामध्ये कॉम्प्युटवर लेखी परीक्षा होईल जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पास होतील अशा उमेदवारांना फिजिकल टेस्टसाठी बोलावण्यात येईल. तसेच त्यानंतर कागदपत्र पडताळणी व नंतर मेडीकल टेस्ट होईल. मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).

Indian Coast Guard Bharti 2024 How to Apply?

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://joinindiancoastguard.cdac.in/cgept ह्या वेबसाईटवर भेट देऊन वन टाईन रजिस्ट्रेशन (ओटीआर) रजिस्ट्रेशन करुन त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरुन फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावी. परिक्षा शुल्क लागू असणार्‍या उमेदवारांनी पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment