
ST Mahamandal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या धुळे जिल्हा यांच्या आस्थापनेवर विविध प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण 256 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी इयत्ता 10 वी पास व संबंधित ट्रेडमधील आयटीआय पास पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करावयाचा असून दिनांक 06/06/2024 पुर्वी अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत.
Vacancy Details
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या आस्थापनेवर भरण्यात येत असलेल्या शिकाऊ पदाच्या एकुण 256 जागा 1 वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यासाठी पदानुसार जागा दर्शविल्या आहेत.
पदाचे नाव | पदसंख्या |
इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक व्हेईकल) | 65 |
इंधन कारागीर (डिझेल मेकॅनिक) | 64 |
पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल फिटर) | 28 |
सांधाता (वेल्डर) | 15 |
इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) | 80 |
कातारी (टर्नर) | 2 |
अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बी.ई.) | 2 |
Total | 256 |
ST Mahamandal Bharti 2024 Eligibility
ST Mahamandal Dhule येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे पात्रता असावी.
- उमेदवार इ.10 वी (SSC) पास असावा.
- संबंधित विषयातील आयटीआय कोर्स पास
ST Mahamandal Bharti 2024 Age Limit
कार्यशाळेकडील व्यवसाय म्हणजेच पद क्र.1 ते 6 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 22/05/2024 रोजी 16 ते 33 वर्ष असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सुट आहे.
ST Mahamandal Bharti 2024 Fee
ह्या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. अमागास / खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु.500/- तर मागासवर्गीय उमेदवारांना रु.250/- रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे शुल्क भरावे लागेल.
ST Mahamandal Bharti 2024 date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 22/05/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 06/06/2024 |
ST Mahamandal Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार उमेदवारांनी अलिकडे काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावर चिकटवून सही करुन ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/06/2024 असुन उमेदवारांनी त्याआधी अर्ज पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवावा.
Read Also | Indian Army Rally Bharti 2024 : भारतीय सैन्य रॅली आयोजित 57 जागांवर भरती
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे