Integral Coach Factory Recruitment 2024 | इंटिग्रल कोच फॅक्टरी आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या 1010 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Integral Coach Factory Recruitment

Integral Coach Factory Recruitment 2024 : इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्न्ई यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) उमेदवारांसाठी भरती जाहिर करण्यात आली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इयत्ता 10वी व आयटीआय पास असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून दिनांक 22/05/2024 पासून ते शेवट दिनांक 21/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Integral Coach Factory Recruitment 2024 Vacancy

इंटिग्रल कोच फॅक्टरी  यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी शिकाऊ पदासाठी एकुण 1010 जागांवर भरती निघाली आहे. कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, फिटर, मशिनिष्ट, पेंटर, वेल्डर इत्यादी पदावर ही भरती होत असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Integral Coach Factory Recruitment 2024 Education Qualification

ही अप्रेंटिस पदासाठी होणार असून उमेदवार  इयत्ता 10 वी मध्ये 50% टक्के गुण घेऊन पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Integral Coach Factory Recruitment 2024 Age Limit

प्रशिक्षणार्थी पदासाठी आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 21/06/2024 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे असावे.  तसेच आयटीआय उत्तीर्ण नसणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्षे ते 22 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे.

Integral Coach Factory Recruitment 2024 Fee

प्रशिक्षणार्थी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना 100/- रुपये परीक्षा फिस भरावी लागणार असून मागासवर्गीय उमदेवारांना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

Integral Coach Factory Recruitment 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.

Integral Coach Factory Recruitment 2024 Application Process

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी  https://pb.icf.gov.in/ या वेबसाईटवर भेट देऊन Apply for Act Apprentice 2024-25 वर Click करुन नवीन रजिस्ट्रेशन करावे. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण शैक्षणिक व इतर माहिती व्यवस्थित काळजीपुर्वक भरुन ऑनलाईन पेमेंट करावे व अर्ज सबमिट करुन प्रिंट काढून ठेवावी.

Leave a Comment