IITM Pune Recruitment 2024 | IITM Pune येथे विविध पदाच्या एकुण 065 जागा, त्वरीत करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
IITM Pune Recruitment 2024
IITM Bharti 2024

IITM Pune Recruitment 2024 : हवामानशास्त्र क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM पुणे येथे विविध पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. हवामान, पर्यावरण आणि हवामान बदल यांसारख्या विविध विषयांवर संशोधन करत असलेली IITM ही संस्था भारतीय हवामान खात्याच्या अंतर्गत येते. एकुण 65 जागांवर भरती करण्यात येत असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून दिनांक 22/05/2024 पासून ते शेवट दिनांक 18/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

IITM Pune Recruitment 2024 Vacancy Details

IITM पुणे या संस्थेतर्फे भरण्यात येत असलेल्या पदांचे नाव व पदसंख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III4
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II11
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III4
ट्रेनिंग कोऑर्डीनेटर1
सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट2
प्रोजेक्ट – II8
प्रोजेक्ट असोसिएट – I33
रिसर्च असोसिएट (डीप ओशियन मिशन)2

IITM Pune Recruitment 2024 Eligibility

IITM Pune येथे निघालेल्या विविध पदाच्या भरतीसाठीची पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे कृपया उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याअगोदार मूळ जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतची माहिती जाणून घ्यावी.

IITM Pune Recruitment 2024 Age Limit

ह्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 45 वर्षे असावे.

Fee

ह्या भरतीकरीता अर्ज करण्यासाठी शुल्क लागू नाही.

IITM Pune Recruitment 2024 Salary

ह्या भरतीकरीता निवड होणाऱ्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल.

पदाचे नाववेतन
प्रोजेक्ट सायंटिस्ट – IIIRs 78,000/- + H.R.A.
प्रोजेक्ट सायंटिस्ट – IIRs 67,000/- + H.R.A.
प्रोजेक्ट सायंटिस्ट – IIIRs 56,000/- + H.R.A.
ट्रेनिंग कोऑर्डीनेटरRs 42,000/- + H.R.A.
सिनिअर प्रोजेक्ट असोसिएटRs 42,000/- + H.R.A.
प्रोजेक्ट – IIRs 35,000/- + H.R.A.
प्रोजेक्ट असोसिएट – IRs 31,000/- + H.R.A.
रिसर्च असोसिएट (डीप ओशियन मिशन)Rs 58,000/- + H.R.A.

IITM Pune Recruitment 2024 last date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक22/05/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक18/06/2024

Selection Process

ह्या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल व त्याआधारे नियुक्ती देण्यात येईल. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)

Read Also : Konkan Railway Recruitment 2024 | कोकण रेल्वेमध्ये विविध पदाच्या एकुण 042 जागा, मुलाखतीमधून होणार निवड

IITM Pune Recruitment 2024 apply online

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी IITM Pune संस्थेच्या https://www.tropmet.res.in/Careers या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • वेबसाईट वर संबंधित जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करा
  • New User असल्यास रजिस्टर करा.
  • अर्ज काळजीपूर्वक भरुन फोटो सही, बायोडाटा आणि इतर कागदपत्रे अपलोड करावी.
  • सर्व माहिती भरल्यावर Confirm करून Form सबमिट करा.
  • अर्जाची प्रत सेव्ह करून ठेवा.

Leave a Comment