BHC Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नविन भरती निघाली आहे. त्यासाठीची अधिकृत जाहिरात उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली असून एकुण 56 लिपिक पदावर ही भरती होणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 13/05/2024 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 27/05/2024 पुर्वी अर्ज करावा लागणार आहे.
Vacancy Details
नागपूर खंडपीठा अंतर्गत जाहिर झालेल्या भरतीमध्ये 45 रिक्त जागा व वेटिंग लिस्टमधील 11 जागा अशा मिळून 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
BHC Bharti 2024 Educational Qualification
- लिपिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. विधी शाखेतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असे जाहिरातीत कळविण्यात आलेले आहे.
- उमेदवाराकडे इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र प्राप्त असावे.
- उमेदवार MS-CIT पास असावा.
Age Limit
लिपिक Clerk पदावर अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमदेवाराचे वय 18 वर्षे 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC/SC/ST प्रवर्गातील उमदेवाराचे वय 18 ते 43 वर्षे असावे. (अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.)
Exam Fee
Bombay High Court Clerk recruitment 2024 Nagpur साठी अर्ज करणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना रु.200/- परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे.
BHC Bharti 2024 Salary
जाहिरात दिलेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिपिक पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना रु.29200/- ते 92300/- एवढा प्रतिमहिना पगार मिळेल.
BHC Bharti 2024 date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 13/05/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 27/05/2024 |
BHC Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शॉर्टलिस्ट आधारे परीक्षेसाठी निवड करण्यात येईल. त्यानंतर उमदेवारांची लेखी परीक्षा, टायपिंग परीक्षा व मुलाखती आधारे निवड करण्यात येणार आहे. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
Bhc bharti 2024 online form apply online Maharashtra
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी Bombay High Court च्या https://bhc.gov.in/nagclerkrecruit/recruitment.php या संकेतस्थळावर भेट द्यावी.
- अर्ज नोंदणी करण्याकरीता ” Registration” यावर क्लिक करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी, ई-मेल आयडी, फोटो सही अपलोड करावा.
- त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |