Agniveer Navy SSR Bharti 2024 | भारतीय नौदलात अग्निवीर पदाची मेगा भरती जाहिरात

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Agniveer Navy SSR Bharti 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर SSR/MR 2024 भरती करण्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर भरती 4 वर्षाच्या कंत्राटी तत्वावर असून अविवाहीत मुले व मुली अर्ज करु शकतात. त्यासाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 13/05/2024 पासून ते शेवट दिनांक 05/06/2024 पर्यंत करता येणार आहे.

Agniveer Navy SSR Bharti 2024 Vacancy Details

भारत सरकारतर्फे दरवर्षी भरती करण्यात येत असलेल्या अग्निवीर भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये भरतीची पात्रता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. Indian Navy SSR/MR मोठी भरती असून एकूण संख्या जाहिर करण्यात आलेली नाही.

Agniveer Navy SSR Bharti 2024 Eligibility

अग्निवीर SSR –

गणित व फिजिक्स विषयासह इ.12 वी (Science) पास किंवा 3 वर्षाचा इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा 2 वर्षाचा व्होकेशनल कोर्स. (नुकतेच इ.12 वी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी अर्ज करु शकतात)

अग्निवीर MR –

50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.

शारीरिक पात्रता व मैदानी चाचणी

लिंग1.6 कि.मी. धावणेस्कॅट्स (उठक बैठक)पुशअप्सBent Knee Sit-ups
पुरुष06 मिनिटे 30 सेकंद201515
महिला8 मिनिटे151010

Agniveer Navy SSR Bharti 2024 Age Limit

इंडियन नेव्हीमध्ये अग्निवीर एसएसआर भरतीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचा जन्म दिनांक 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या दरम्यान झालेला असावा. (म्हणजेच उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्षे असावे)

Exam Fee

या मेगारभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रुपये 550/- + 18 टक्के जीएसटी एवढे परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

Agniveer Navy SSR Bharti 2024 Salary

नेव्हीमध्ये अग्निवीर SSR / MR मध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना दरमहा रु.30,000/- Fix वेतन मिळणार आहे. तसेच दरवर्षी वेतनामध्ये वाढ करण्यात येईल. शेवटच्या म्हणजेच चौथ्या वर्षी रु.40,000/- वेतन मिळेल.

Agniveer Navy SSR Bharti 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक13/05/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक05/06/2024

Agniveer Navy SSR Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची Short List द्वारे निवड करण्यात येईल. यामध्ये Stage-I व Stage-II याप्रमाणे लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता / मैदानी चाचणी यामधील गुणांच्या मेरीटआधारे करण्यात येईल.

Agniveer navy ssr bharti 2024 apply online form

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी https://agniveernavy.cdac.in/sailorscycle3/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज नोंदणी करण्याकरीता “Register” यावर क्विक करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करुन “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in 1d व Password, email id द्वारे प्राप्त होईल त्यानंतर सदर Log-in Id व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
  • आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य रितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “Submit & Pay” बटनवर क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
  • ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment