NPCIL Bharti 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 400 जागांवर भरती, पगार 55,000/-

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

NPCIL Bharti 2024 : न्यूक्लियर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या जागा भरण्यासाठीची जाहितीरात प्रसिध्दकरण्यात आली आहे. ज्यामध्ये इंजिनिअरींग क्षेत्रात करीअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना NPCIL मध्ये काम करण्याची निर्माण झाली आहे. या भरतीसाठी नोकरीच्या शोधात असणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 30/04/2024 पुर्वी अर्ज करावा लागेल.

NPCIL Bharti 2024 Vacancy

एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या शाखानुसार विविध जागा असून त्यांची संख्या खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

शाखापद संख्या
मेकॅनिकल150
केमिकल73
इलेक्ट्रिकल69
इलेक्ट्रॉनिक्स29
इंस्ट्रुमेंटेशन19
सिव्हिल60
Total400

NPCIL Bharti 2024 Education Qualification

एक्झिक्युटिव ट्रेनी पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार

  1. BE/B.Tech/B.Sc (Engg.) / M.Tech (Mechanical / Chemical / Electrical/ Electronics/ Instrumentation/ Civil) 60% गुणांसह संबंधित उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. GATE 2022, 2023 व 2024 या परिक्षांमध्ये उत्तीर्ण असावा.

Age Limit

एक्झिक्युटिव ट्रेनी पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी असल्यास उमेदवार अर्ज करु शकणार नाही तसेच 26 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात आली असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Application Fee

एक्झिक्युटिव ट्रेनी पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवेदन शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये General/ OBC/ EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.500/- शुल्क असून SC/ST/PwBD/DODPKIA/महिला उमेदवारांना शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.

NPCIL Bharti 2024 Salary

ट्रेनिंग प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना 55,000 रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे. या सोबत अधिकचे 18,000 रुपये पुस्तके घेण्यासाठीचा भत्ता आणि इतर बरेचसे भत्ते पात्र उमेदवारांना मिळणार आहेत.

NPCIL Bharti 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक10 एप्रिल, 2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक30 एप्रिल, 2024

NPCIL Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड ही मेरिट वर होणार आहे तसेच Gate 2022, 2023, 2024 या वर्षी ज्या उमेदवारांनी गेट ची परीक्षा दिली आहे आणि पास केली आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या Exam Marks द्वारे Shortlist केले जाणार आहे.

अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवाराची लिस्ट बनवली जाणार असून त्याद्वारे मेरिट लिस्टमध्ये ज्या अर्जदाराचे नाव येईल त्यांना NPCIL Bharti 2024 अंतर्गत रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.

Read Also : नाशिक येथे अप्रेंटिस पदाच्या जागा, इंजिनिअर असाल करा अर्ज

NPCIL Bharti 2024 Application Process

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.npcilcareers.co.in/ या अधिकृत संकेतस्थळ वेबसाईटवर भेट द्या.
  • NPCIL Bharti 2024 साठी फॉर्म Open करा, विचारलेली सर्व माहिती भरून घ्या.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म भरताना अपलोड करा.
  • Open, OBC आणि EWS या प्रवर्गातील अर्जदारांना फी भरायची आहे, त्यांनी ऑनलाईन फी भरावी. इतर प्रवर्गातील आणि सर्व महिलांना देखील फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे.
  • सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment