RPF Bharti 2024 | आरपीएफ मध्ये 4660 पदांची महाभरती, 10वी पास असाल तर आजच करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
RPF Bharti 2024
RPF Bharti 2024

RPF Bharti 2024 | रेल्वे सुरक्षा दलात एकूण 4660 पदांवर भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीमध्ये RPF Constable व RPF Sub Inspector पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. तरीही सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 15 एप्रिल 2024 ते 14 मे 2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात. त्यासाठीची ऑनलाईन लिंक खाली दिली आहे. मुळ जाहिरात वाचुन शैक्षणिक पात्रता, वय व परीक्षा शुल्काची माहिती करुन घ्यावी.

RPF Bharti 2024 Vacancy

रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच Railway Protection Force RPF भरती 2024 मध्ये एकुण 4660 जागांवर होणाऱ्या भरतीमध्ये Constable पदाच्या 4208 जागा तर Sub Inspector पदाच्या 452 जागा असून अशा रिक्त असलेल्या जागेवर ही भरती प्रक्रिया होत आहे. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 14 मे 2024 असुन उमेदवारांनी शेवट दिनांकापुर्वी अर्ज करावा.

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1.RPF Constable4208
2.RPF Sub Inspector452
एकूण4660
RPF constable and Sub Inspector Bharti 2024 Details table

RPF Bharti 2024 Eligibility

Educational Qualification

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार RPF Bharti 2024 साठी लागणाऱ्या Constable आणि Sub Inspector पदासाठीची शैक्षणिक पात्रता व वयाची अटी वेगवेगळ्या निश्चित कलेल्या आहेत.

पदाचे नावपात्रता
Constableउमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा
Sub Inspectorपदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.
RPF Educational Qualification details table

Age Limit

  • Constable पदावर अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय दिनांक 01 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
  • Sub Inspector पदावर अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये सरकारी नियमानुसार सूट देण्यात आली असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट आहे तर SC/ST 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

RPF Bharti 2024 Fees

रेल्वे सुरक्षा दलात होणा-या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये General/OBC/EWS रु.500/- रुपये शुल्क असून SC/ST/ExM/EBC/Minority व महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रु.250/- रुपये शुल्क भरावे लागेल.

RPF Bharti 2024 apply online apply last date

प्रेस नोटीस02/01/2024
Short Notification 02/03/2024
अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक15/04/2024
अर्ज करण्याची शेवट दिनांक14/05/2024
Notification dates of RPF Bharti 2024

Selection Process

RPF Bharti 2024 साठी Constable व Sub Inspector पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना खालील प्रक्रियेतुन जावे लागणार आहे. त्यासाठी प्रथम संगणकावरील लेखी परिक्षा, शारीरिक पात्रता, कागदपत्रांची पडताळणी व मेडीकल चाचणी आधारे निवड केली जाणार आहे.

RPF Bharti 2024 Salary

Constable निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.21,700/- वेतन तसेच Sub Inspector निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.35,400/- वेतन व इतर भत्त्याचा लाभ मिळेल.

Read Also : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 पदांची बंपर भरती, असा करा अर्ज

How to apply RPF Bharti 2024 apply online form

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ ह्या लिंकवर जाऊन प्राथमिक रजिस्ट्रेशन करावे व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी. सही, फोटो व इतर शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन फि भरुन अर्जाची प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment