SAIL Bharti 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 163 पदांची बंपर भरती, असा करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

SAIL Bharti 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या असून जाहिरात क्र.SL/R/2024/01 मध्ये 108 पदे असून जाहिरात क्र. BSL/R/2024/02 मध्ये 55 पदे असून अशा एकूण 163 पदांवर ही भरती होत आहे. तरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी निर्माण झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवट दिनांकापुर्वी ऑनलाईन अर्ज करावा.

जाहिरात क्र.SL/R/2024/01  एकुण 108 पदांविषयी

Sail Bharti 2024

जाहिरात क्रमांक 1 मध्ये सिनियर कंसल्टंट, कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर (Safety), ऑपरेटर कम टेक्निशियन (Boiler), अटेंडंट कम टेक्निशियन (Boiler), माइनिंग फोरमन, सर्व्हेअर, ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Mining), ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Electrical), माइनिंग मेट, माइनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी अशा एकुण 108 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

SAIL Bharti 2024 Education Qualification

विविध पदासाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी उमेदवारांकडे वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. तसेच काही पदासाठी अर्ज करण्यासाठी अनुभवाचीी सुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SAIL Bharti 2024 Age Limit

वरील पदावर अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 07 मे 2024 कमीत कमी 28 वर्षे व जास्तीत जास्त 44 वर्षापर्यंत असावे. वयाची ही अट विविध पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी उमदेवारांनी अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून घ्यावी. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST/अपंग उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे.

SAIL Bharti 2024 Fee

या भरतीप्रक्रियेमध्ये विविध पदांवर अर्ज करण्यासाठी पदानुसार व प्रवर्गानुसार अर्ज शुल्क हे वेगवेगळे आहे. काही पदांवर अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण/ओबीसी/EWS उमेदवारांना रु.700/-,रु.500/- व रु.300/- शुल्क भरावे लागणार आहे.  तसेच SC/ST/PWD साठी रु.200/-,रु.150/-,रु.100/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

SAIL Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कॉम्प्युटरद्वारे लेखी परिक्षा आधारे मेरीटनुसार होणार आहे. तरी विविध पदानुसार वेगवेगळी निवड पध्दती असुन त्यासाठी PDF जाहिरात वाचून घ्यावी.

SAIL Bharti 2024 Important Dates

  • जाहिरात नोटिफिकेशन दिनांक : 15/03/2024
  • अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 07/05/2024
  • अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 16/04/2024

SAIL Bharti 2024 Application Process

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी  https://www.sail.co.in या वेबसाईटवरुन Career पेजवरुन current opening job वरुन नवीन नोंदणी करावी. आवश्यक असलेली प्राथमिक माहिती, शैक्षणिक माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी. संपूर्ण अर्ज न चुकता भरुन ऑनलाईन पेमेंट करावे व त्यानंतर अर्ज सबमिट करुन प्रिंट काढून ठेवावी.

Read also : AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ज्युनियर एक्झिक्युटीव पदाच्या 490 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु

जाहिरात क्र. BSL/R/2024/02 एकुण 55 पदांविषयी

जाहिरात क्रमांक 2 मध्ये मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर अशा एकुण 55 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Education Qualification

  1. मॅनेजर – पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे – 60% गुणांसह B.E/B.Tech पदवी किंवा M.Sc./M.S.c (Tech)/M.Tech (Geology /Applied Geology) व 7 वर्षाचा अनुभव.
  2. डेप्युटी मॅनेजर – या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Civil/Electrical) पदवी उत्तीर्ण व 4 वर्षाचा अनुभव.

Age Limit

मॅनेजर पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय दिनांक 16/04/2024 रोजी 35 वर्षापर्यंत असावे, तसेच डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय 32 वर्षे असावे. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST/अपंग उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे.

Fee

मॅनेजर व  डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण/ओबीसी/EWS उमेदवारांना रु.700/- शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC/ST/PWD साठी रु.200/- शुल्क भरावे लागणार आहे.

Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कॉम्प्युटरद्वारे लेखी परिक्षा व त्यानंतर मुलाखतीच्या गुणांच्या आधारे मेरीटनुसार होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचा Training and Probation असेल.

Important Dates

  • जाहिरात नोटिफिकेशन दिनांक : 15/03/2024
  • अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26/03/2024
  • अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 16/04/2024

Application Process

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी  https://www.sail.co.in  या वेबसाईटवरुन Career पेजवरुन current opening job वरुन नवीन नोंदणी करावी. आवश्यक असलेली प्राथमिक माहिती, शैक्षणिक माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी. संपूर्ण अर्ज न चुकता भरुन ऑनलाईन पेमेंट करावे व त्यानंतर अर्ज सबमिट करुन प्रिंट काढून ठेवावी.

Leave a Comment