
CLW Bharti 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकुण 492 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 10वी व आयटीआय पास आहेत, परंतु नोकरी नसल्याने बेरोजगार आहे व नोकरीचा शोध घेत आहेत असे पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 18/04/2024 पुर्वी अर्ज करावा.
CLW Bharti 2024 Vacancy
- फिटर – 200
- टर्नर – 20
- मशीनिस्ट – 56
- वेल्डर – 88
- इलेक्ट्रिशियन – 112
- रेफ.एसी – 04
- पेंटर – 12
अशा विविध ट्रेडनुसार अप्रेंटिससाठी एकुण 492 जागा असून त्यामध्ये फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, रेफ. आणि एसी आदी पदावर ही भरती होत असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
CLW Bharti 2024 Education Qualification
ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार असून उमेदवार फक्त इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्तीच्या शिक्षणाची आवश्यकता नाही.
CLW Bharti 2024 Age Limit
ट्रेडनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 27 मार्च 2024 रोजी 15 वर्षापेक्षा कमी असल्यास उमेदवारांना अर्ज करता येणार नाही तसेच 24 वर्षापेक्षा जास्त वय असेल तरीही अर्ज करता येणार नाही म्हणजेच उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षा दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST/अपंग उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे.
Application Fee
अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.
CLW Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.
CLW Bharti 2024 apply online
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवरुन अप्रेंटिससाठी नोंदणी करावी व कागदपत्रे अपलोड करुन आधार सत्यापित करुन घ्यावे. अर्जामध्ये असलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपुर्वक भरावी व अर्ज सबमिट करुन प्रिंट काढून ठेवावी.
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट Clw bharti 2024 official website | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |