
SECR Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकुण 1113 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये 10वी पास व आयटीआय उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना ट्रेड अप्रेंटिस म्हणून काम करण्याची निर्माण झाली आहे. नोकरीच्या शोधात असणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 01/05/2024 पुर्वी अर्ज करावा लागेल.
SECR Bharti 2024 पदांचा तपशिल
ट्रेड अप्रेंटिससाठी विविध ट्रेडनुसार एकुण 1113 जागा असून त्यामध्ये वेल्डर, टर्नर, फिटर, इलेक्ट्रीशियन, स्टेनोग्राफर इंग्रजी, स्टेनोग्रोफर हिंदी, कॉम्प्यूटर ऑपरेटर, हेल्थ सॅनिटरी इन्सपेक्टर, मशिनिष्ट, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेटर, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स आदी पदावर ही भरती होत आहे.
SECR Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
ही भरती ट्रेड अप्रेंटिस पदासाठी होणार असून उमेदवार इयत्ता 10 वी मध्ये 50% टक्के गुण घेऊन पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
SECR Bharti 2024 वयोमर्यादा
ट्रेडनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 02 एप्रिल 2024 रोजी 15 वर्षापेक्षा कमी असल्यास उमेदवार अर्ज करु शकणार नाही तसेच 24 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात आली असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST/अपंग उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
SECR Bharti 2024 परिक्षा शुल्क
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून प्रक्रिया निशुल्क राबविण्यात येणार आहे.
SECR Bharti 2024 निवड प्रक्रिया
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.
SECR Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवरुन अप्रेंटिससाठी नोंदणी करावी व कागदपत्रे अपलोड करुन आधार सत्यापित करुन घ्यावे. अर्जामध्ये असलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपुर्वक भरावी व अर्ज सबमिट करुन प्रिंट काढून ठेवावी.
Read Also : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 335 जागा, असा करा अर्ज
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा | Click Here |