
गृहमंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोच्या विविध रिक्त पदांवर भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. IB Bharti 2024 साठी एकुण 660 रिक्त पदांची भरती होऊ घातली असून त्यामध्ये Group B and Group C Non-Gazette Rank असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, पर्सनल असिस्टंट, प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, केअरटेकर, सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार एम्प्लॉयमेंट न्युज मध्ये जाहिरात प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून 60 दिवसाच्या दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाद्वारे पाठवायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 30/05/2024 आहे.
IB Bharti 2024 Vacancy
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / कार्यकारी, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / कार्यकारी, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी/ कार्यकारी, सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी या व अशा विविध पदांसाठी हि भरती होणार असून एकूण 660 जागा भरण्यात येणार आहेत.
IB Bharti 2024 Educational Qualification
या भरतीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या पदांवर अर्ज करण्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित केलेली आहे. तसेच काही पदांसाठी अनुभव सुद्धा आवश्यक असल्याने उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण अधिकृत माहिती मूळ जाहिरातीमधून वाचून घ्यावी.
IB Bharti 2024 Age Limit
वय वर्षे 18 ते 56 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
Application Fee
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अर्ज फक्त ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी / शुल्क लागू नाही. संपूर्ण भरती प्रक्रिया निशुल्क आहे.
Read Also : महाराष्ट्र शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती, एकूण 200 जागा, 10 वी पास उमेदवारांना संधी..!!
IB Bharti 2024 Application Salary
रु.19,900 ते रु.1,51,100 प्रतिमहिना असे असून अनुभव आणि पदानुसार वेतन वेगवेगळे आहे.
IB Bharti 2024 Important Dates
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार एम्प्लॉयमेंट न्युज मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत अर्ज पोस्टाने सादर करावा. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30/05/2024 असा आहे.
IB Bharti 2024 Application Process
पात्र उमेदवारांनी कागदपत्रांसह अर्ज 60 दिवसांच्या आत पोस्टाने पोहचेल अशा बेताने पाठवायचे आहेत. अर्ज करण्यासाठी पत्ता – डायरेक्टर/जी-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, ३५ एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021.