महाराष्ट्र शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती, एकूण 200 जागा, 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे अंतर्गत एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मेहकर ता.मेहकर, जि.बुलडाणा अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमासाठी जालना जिल्ह्यात गावनिहाय स्वयंसेवक भरती करण्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण 200 जागांसाठी ही भरती होत असून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींसाठी ही चांगली संधी निर्माण झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 15/04/2024 पुर्वी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती एकुण जागा

शिक्षण विभागांतर्गत होत असलेल्या स्वयंसेवक पदाच्या एकूण 200 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आफलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे.

शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती शैक्षणिक पात्रता

स्वयंसेवक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी व मान्यताप्राप्त विद्यापीठाची D. Ed. / A.T.D./ B.Ed./ B.Ped. / M.S.W./ B.S.W. पदवी.

शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती वयोमर्यादा

स्वयंसेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या वयाच्या अटीबाबत जाहिरातीमध्ये कोणताही उल्लेख केलेला नसून 18 वर्षे वयाच्या पुढील उमेदवारांनी अर्ज करायला हरकत नाही.

शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती फी

स्वयंसेवक पदासाठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करावयाचा असून अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी / शुल्क लागू नाही. संपूर्ण भरती प्रक्रिया निशुल्क आहे.

हे पण वाचा : बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना संधी 143 जागांवर ऑफिसर पदाची भरती

शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती महत्वाच्या तारखा

दिनांक 01/04/2024 रोजी पासून ऑफलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 15/04/2024 पर्यंत पोस्टाद्वारे ऑफलाईन अर्ज करता येईल.

शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती अर्ज करण्याची पध्दत

महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी , विश्वनाथ विद्यालयाशेजारी शिरपूर रोड, तळणी ता.मंठा जि. जालना ( या पत्त्यावर अर्ज सकाळी 9 ते दुपारी 01 वाजेपर्यंत पोस्टाने पाठवावेत )

Leave a Comment