
Surya Grahan April 2024 चे सुर्य ग्रहण सुरु होत आहे. ह्या वेळेसचे सुर्यग्रहण भारतात दिसण्याची शक्यता नाही. काही ठिकाणी सूर्य ग्रहणामुळे पूर्णता अंधार होईल.
Surya Grahan April 2024 पंचांगानुसार सन 2024 चे प्रथम सुर्य ग्रहाण 8 एप्रिल 2024 रोजी सुरु होईल. ह्या वर्षीच्या सोमवती अमावशेच्या दिवशी मीन राशि मध्ये सुर्य ग्रहण लागणार आहे. 8 एप्रिल 2024 च्या रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सूर्य ग्रहण सुरु होईल आणि 4 तास 25 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण राहणार आहे. ज्योतिष मंडळीच्या माहितीनुसार, सुमारे 50 वर्षानंतर सर्वात जास्त वेळ हे ग्रहण राहणार आहे. परंतु भारतात हे सुर्यग्रहण दिसणार नाही. म्हणून सामान्य लोकांवर याचा काही खास प्रभाव पडण्याची शक्यता नाही त्यामुळे सूतक काळ राहणार नाही.
येथे दिसणार सूर्य ग्रहण ?
Surya Grahan April 2024 चे पहिले सूर्य ग्रहण मुख्यत: अटलांटिक, आर्कटिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका, कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि इंग्लंड च्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये दिसणार आहे. भारतासहीत शेजारील देशांमध्ये हे सुर्यग्रहण दिसणार नाही. ज्यामध्ये श्रीलंका, पाकीस्तान, नेपाळ या देशांचा समावेश आहेसूर्य ग्रहणाचे प्रकार?
1. पूर्ण सूर्य ग्रहण
2. वार्षिक सूर्य ग्रहण
3. आंशिक सूर्य ग्रहण
4. हायब्रिड सूर्य ग्रहण
जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेतून जातात तेव्हा सूर्य ग्रहणाची स्थिती निर्माण होते. 8 एप्रिल रोजी पूर्ण सूर्य ग्रहण लागेल. ही परिस्थिती तेव्हा निर्माण होती जेव्हा पृथ्वी आणि सूर्य ग्रहाण कालावधीत मधोमध चंद्र येतो. यावेळेला सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडत नाही.
सूर्य ग्रहणाचा 12 राशींवरील प्रभाव?
सूर्य ग्रहणामध्ये मेष राशीपासून तर मीन पर्यंत सर्वच 12 राशींवर प्रभाव होतो. त्यामुळे मेष, वृश्चिक, कन्या, कुंभ आणि धनु राशि असलेल्या लोकांना जीवनामध्ये चढ-उतार होऊ शकतात. तसेच, मिथुन, वृषभ, कर्क आणि सिंह राशि असलेल्या लोकांना आनंद प्राप्ती होऊ शकते.
भारत दिसलेले शेवटचे सूर्य ग्रहण ?
भारतामध्ये 26 डिसेंबर 2019 रोजी शेवटचे सूर्य ग्रहण दिसले होते. त्याची सुरुवात पहाटे 5 वाजून 18 मिनिटांनी झाली होती.
भारतात केव्हा दिसेल सूर्य ग्रहण ?
या वर्षी जरी भारतात सूर्य ग्रहण दिसणार नाही तरी 21 मे 2031 रोजी भारत सूर्य ग्रहण दिसेल.
सूचना : वरील दिलेली माहितीवर संपूर्ण सत्यता व अचूक आहे असा दावा आम्ही करीत नाही. संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.